GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळील इमारतीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

रत्नागिरी : अनोळखी पुरुष इसम रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील संगम हॉटेलचे बाजुचे पडीक ईमारतीच्या गाळ्यात बेशुध्द अवस्थेत पडलेला मिळुन आला त्याचे वय अंदाजे ५५ वर्ष, असुन तो एक वर्षापासुन रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात भिक मागुन आपली उपजिवीका करत असे. असे तेथील स्थानीक दुकानदार यांचेकडुन समजले. सदर मयताचे चेहऱ्यावर व अंगावर माशा व पांढरट आळ्या पडलेल्या असुन सदर अनोळखी इसमास खाजगी अॅम्बुलन्सने रत्नागिरी सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन तो दि.१९/०६/२०२५ रोजी १४.०० वा. चे पुर्वी मयत झाला असल्याचे घोषित केले. म्हणुन खबर देणार यांनी दिले खबरी वरुन वरील प्रमाणे अ.मृ. रजि. दाखल आहे.

सदर आनोळखी मयताचे वर्णनः- अनोळखी पुरुष नाव गांव समजुन येत नाही, वय सुमोर ५५ वर्ष, चेहऱ्यावर व पुर्ण शरीरावर माशा व आळ्या पडलेल्या, अंगात पांढरट मळकटलेले हाफ हाताचे टि-शर्ट असुन नेसणीस राखाडी रंगाची हाफ पॅन्ट असे आहे.

Total Visitor Counter

2475129
Share This Article