GRAMIN SEARCH BANNER

नाटे येथे ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्ष-किरण तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाटे/ राजन लाड- ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत 31 जुलै 2025 रोजी नाटे उपकेंद्रात आयोजित करण्यात आलेल्या क्ष-किरण तपासणी शिबिराला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. या शिबिरात नाटे, कशेळी, धाऊल वल्ली आणि राजवाडी कार्यक्षेत्रातील एकूण 154 नागरिकांची तपासणी करण्यात आली. क्षयरोगाच्या संभाव्य रुग्णांना लवकर शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या तपासणी शिबिरात विशेषतः 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह रुग्ण, तसेच मागील 5 वर्षांतील क्षयरुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन नाटे सरपंच श्री. संदीप बांदकर आणि साखरीनाटेचे उपसरपंच श्री. नौशाद धालवेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नाटे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष चव्हाण, सुनील डूगीलकर, सचिन बांदकर, मजीद गोवळकर, मुख्याध्यापक जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात जिल्हा क्षयरोग केंद्राचे पीपीएम समन्वयक श्री. श्रीकांत सावंत, आरोग्य सहायक श्री. मंगेश पाटील, क्ष-किरण तंत्रज्ञ श्री. निलेश हंगे, क्षयरोग पर्यवेक्षक श्री. राहुल कोकणे, प्रयोगशाळा पर्यवेक्षक श्रीमती आचल मळेकर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथील सुपरवायझर श्री. कुंभार यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यात नाटे उपकेंद्राचे श्री. मयूर वानखेडे, कशेळी उपकेंद्राचे श्री. कांबळे, वाडा पेठ उपकेंद्राच्या श्रीमती ममता दुधडे, धाऊल वल्ली उपकेंद्राचे श्री. गेजगे, आरोग्य समुदाय अधिकारी श्री. शरद ढवळे, श्री. धनवे, श्री. सोलणकर, आरोग्य सेविका श्रीमती मुलानी, श्रीमती घवाळी, श्रीमती माधुरी वानखेडे, श्रीमती सायली जाधव, वाहनचालक श्री. सुतार, तसेच गटप्रवर्तक आणि इतर आरोग्य सेविकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

शासनाच्या ‘टीबी मुक्त भारत’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला बळ देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. या शिबिरामुळे क्षयरोगाच्या लवकर निदानाची आणि उपचाराची प्रक्रिया सुरू झाली असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Total Visitor Counter

2455624
Share This Article