GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये 35 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

खेड – तालुक्यातील असगणी समर्थनगर येथील एका ३५ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रिया राजेश जाधव असे मृत महिलेचे नाव असून, तिला उपचारासाठी कराड येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
ही घटना १६ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. रिया जाधव यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांना ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर, तिला तातडीने लोटे येथील परशुराम रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला सातारा जिल्ह्यातील कराड येथील सह्याद्री रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.४५ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2475463
Share This Article