GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : कर्ला-आंबेशेत गावची गणेश आगमन मिरवणूक उत्साहात

रत्नागिरी: कर्ला-आंबेशेत येथील घरगुती श्री गणेश आगमन मिरवणूक अतिशय भव्यदिव्य आणि दिमाखदार उत्साही वातावरणात आज पार पडली.

सकाळी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याला पुष्पहार घालून ९.३० वाजता सुरू झालेली ही मिरवणूक दुपारी ३ वाजल्यानंतर कर्ला-आंबेशेत गावी पोहोचेली.

या मिरवणुकीमध्ये दोन्ही गावांमधील सुमारे १०० लहान-मोठ्या श्री गणेशमूर्ती विविध वाहनांवरून निघाल्या. सोबत विविध पथके होती. ढोलताशे, झांजपथक, बागलकोटचे बॅण्डपथक, आंबेशेत (घोसाळेवाडी) येथील शिवशक्ती मित्रमंडळाचे भजन मंडळ, कर्ला येथील गणराज महिला मंडळाचे लेझिम पथक तसेच संगम बीट्स, नाचणे सुपलवाडी यांचे ढोलपथक सवाद्य मिरवणुकीत सहभागी झाले होते.

घरगुती गणेश आगमनाच्या या मिरवणुकीचा प्रारंभ ४० वर्षांपूर्वी शाहीर कै. मधुकर (आप्पा) सुर्वे यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाखाली झाला. कर्ला-आंबेशेत श्री गणेश आगमन मिरवणुकीचा मार्ग नेहमीप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळयापासून गोखले नाका, श्रीराम आळी, एसटी बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, निवखोल घाटी, आदमपूर, राजिवडा, मारुती मंदिर कर्ला असा होता. मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली.

Total Visitor Counter

2475385
Share This Article