GRAMIN SEARCH BANNER

निवळी येथे साफसफाई करताना विद्युत तारेच्या स्पर्शाने दोघांचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी: साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास निवळी परिसरातील शिंदेवाडी येथे घडली.

चंद्रकांत यशवंत तांबे (४०) आणि मृदुला वासुदेव वाडकर (६० दोन्ही रा. निवळी, रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच निवळी गावाचे उपसरपंच संजय निवळकर ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.

Total Visitor Counter

2455624
Share This Article