“पर्यटन स्थळांच्या विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची आमदार किरण सामंत यांची ग्वाही”
तुषार पाचलकर (राजापूर)
राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या माय राजापूर संस्थेने पर्यटन विकासासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार त्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शासन स्तरावर आपण प्रयत्न करणार असून लवकरच संबंधित खात्याचे अधिकारी आणि माय राजापूरचे सदस्य यांची भेट घडवून आणणार आहोत. माय राजापूर संस्थेने देखील मंजूर कामांवर लक्ष ठेवावे आणि दर्जेदार कामे कशी होतील त्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार किरण सामंत यांनी दिल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास आराखडा माय राजापूर संस्थेच्या वतीने आमदार किरण सामंत यांना सादर करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली.
राजापूर तालुक्यातीत विविध पर्यटन स्थळांचा जागेवर जाऊन त्यांचा विकास करण्यासाठी कोणत्या प्राथमिक बाबी आवश्यक आहेत व कोणत्या दूरगामी विचार करताना कोणत्या दूर ग्रामी बाबी विचारात घ्यायला हव्यात याचा अभ्यास करून आर्किटेक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर तालुका पर्यटन विकास आरडा तयार केला आहे. सदर आराखडा शुक्रवारी आमदार किरण सामंत यांना सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित माय राजापूर संस्थेच्या सदस्यांनी राजापूर तालुका पर्यटन विकास आराखडा करण्याचा मूळ उद्देश, त्याचा हेतु विषद केला
कोळणासाठी राज्य शासनाने पर्यटन विषयक वेगळा निधी द्यावा व त्याचे वितरण ग्रामपंचायत जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन अश्या वेगवेगळ्या स्तरावर व्हावे.पर्यटन स्थळावर स्वच्छतागृह , पार्किंग व्यवस्था, पथदीप ही व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी अस्तित्वातील रस्त्याची देखभाल दुरुस्ती जिल्हापरिषद “मार्फत व्हावी. मोठे पुल, नवीन रस्ते व नाविन्यपूर्ण बाबी या महाराष्ट्र शासन मार्फत करण्यासाठी या आराखड्याचा उपयोग व्हाया हा प्राथमिक हेतु आहे, हे सांगण्यात आले.यावर निधी देणाऱ्या खात्यामार्फत अधिक माहिती घेऊन अंदाजपत्रके बनविण्यात यावीत. अशा सूचना माय राजापूर संस्थेच्या वतीने करण्यात आल्या.
राजापूर तालुक्याच्चा पर्यटन विकास आराखाड़ा करताना उन्हाळे येथील राजापूरची गंगा खडपेवाडी येथील शिवकालीन वखार पुनर्निर्माण, शिवकालीन पुल’जवाहर चौक यशवंत गड नाटे, कशेळी सनसेट पॉईंट, वेत्ये येथील समुद्रकिनारा, आंबोळगड समुद्रकिनारा, माडबन समुद्रकिनारा, दांडे समुद्रकिनारा, चुणाकोळवण धबधबा, ओझरकडा (सौदळ)धबधबा,, काजीर्डा, धबधबा , हर्डी कातळकडा धबधबा , श्री. धूतपापेश्वर मंदिर, कनकादीत्य मंदिर, कशेळी , महाकाली मंदिर, आडिवरे, भार्गवराम मंदिर, देवाचे गोठणेआर्यादुर्गा मंदिर देवीहसोळ , श्री.विमलेश्वर मंदिर, तेरवण , श्री अंजनेश्वर मंदिर, मिठगवाणे , श्री मल्लिकार्जुन मंदिर प्रिंदावन, श्री संघनाथेश्वर मंदिर, रायपाटण, श्री शांतादुर्गा लक्ष्मीनृसिंह मंदिर, केळवली,राजापुरातीत कातळशिल्प, इत्यादी पर्यटन स्थळांचा समावेश विकास आराखडयात करण्यात आला आहे. राजापूर तालुक्याच्या पर्यटन स्थळांचा विकास आराखडा शुक्रवारी आमदार किरण सामंत यांना सादर करण्यात आला. त्याप्रसंगी माय राजापूर संस्थेच्या वतीने नायब तहसीलदार श्रीम दीपाली पंडित, श्रीम. प्रणीती भोसले, सुपाताई चव्हाण, ऍड यशवंत कावतकर,नित्यानंद पाटील, प्रदीप कोळेकर, जगदीश पवार -ठोसर, संदीप देशपांडे नरेशदसवंत,चंद्रशेखर सिनकर हृषिकेश कोळेकर आदी माय राजापूर संस्थेचे सदस्य उपस्थित होते.