मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील आणि लवकरच निर्णय जाहीर होईल.’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले,’ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील. यासंदर्भात महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील. लवकरच निर्णय जाहीर होईल.”उद्धव ठाकरेंची मुंबईत मोठी ताकत आहे. त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल.’ असेही शरद पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
