रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील रस्ता कामाच्या ठिकाणी पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत होऊन काशीनाथ कल्लाप्पा जोगळेश्वर (वय ४०, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) यांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत काशीनाथ जोगळेश्वर हे ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता घरातून निघाले होते. चालत रस्त्याने जात असताना साळवी स्टॉप येथील रस्ता काम सुरू असलेल्या ठिकाणी पाय घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या मित्र नारायण यांनी त्यांना रात्री ७.२० वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा पुरुष वॉर्ड, सिव्हिल हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.