GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: रत्नाकर चव्हाणने मिळविला एकविसाव्या वर्षी सीएमएचा पदवीचा बहुमान

राजापूर : ओझर येथील रत्नाकर श्रीकांत चव्हाण या तरुणाने केवळ एकविसाव्या वर्षी प्रतिष्ठेच्या सीएमए पदवीचा बहुमान मिळविला आहे.

‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ या संस्थेमार्फत गेल्या जूनमध्ये झालेल्या सीएमए फायनल ग्रुप ४ परीक्षेत त्याने उल्लेखनीय यश मिळवत फायनल कम्प्लीटेड हा दर्जा प्राप्त केला.
.रत्नाकरचे प्राथमिक शिक्षण ओझर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून त्याने पूर्ण केले. सीएमए करण्याचा ध्यास घेत रत्नाकरने प्रथम इंटरमीजिएट परीक्षा आणि आता फायनल परीक्षा उच्च गुणवत्तेसह उत्तीर्ण करत आपल्या मेहनतीचा व चिकाटीचा आदर्श घालून दिला आहे.

रत्नाकरचे वडील श्रीकांत चव्हाण यांचा पारंपरिक सलून व्यवसाय असून, कुटुंबाच्या साध्या पार्श्वभूमीवरून रत्नाकरने मिळवलेले हे यश गावासह जिल्ह्याचा अभिमान वाढवणारे आहे. कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयनिष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, असा संदेश रत्नाकरने आपल्या यशातून दिला आहे, अशा शब्दांत निवृत्त शिक्षक प्रकाश पाध्ये आणि ग्रामपंचायत सदस्य जहीर टोले यांनी त्याचे अभिनंदन केले.

Total Visitor Counter

2474906
Share This Article