रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे येथील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २५ जुलै रोजी ही महिला मृत झाल्याची घटना घडली.
पुर्णगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाखरे येथील रहिवासी असलेल्या सुनीता चंद्रकांत जाधव (वय ७०) या महिलेने २४ जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.
औषध प्राशन केल्याचे लक्षात येताच, त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सुनीता जाधव यांना कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये पाठवले.
२५ जुलै रोजी पहाटे ५.१५ वाजता सुनीता जाधव यांना सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
या प्रकरणी पुर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलीं आहे.
रत्नागिरी : विषारी औषध प्राशन केल्याने नाखरे येथील वृद्ध महिलेचा कोल्हापूरमध्ये मृत्यू
