GRAMIN SEARCH BANNER

राज्य अंतर्गत तक्रार समितीत नमिता कीर यांची नियुक्ती

Gramin Varta
6 Views

राज्य मराठी विकास संस्थेत कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी

रत्नागिरी: राज्य मराठी विकास संस्थेमधील अंतर्गत तक्रार समितीमध्ये श्रीमती नमिता कीर यांची अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम -२०१३” नुसार स्थापन झालेल्या या समितीचा उद्देश महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे हा आहे. या बदलामुळे समिती अधिक प्रभावीपणे काम करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

नमिता कीर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा असून महाराष्ट्र विश्वकोष मंडळावर सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. याशिवाय रत्नागिरी जिल्हा भाषा समितीवर सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या समितीवर त्यांची दुसर्‍यांदा नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वीही त्या अशा समितीवर कार्यरत होत्या.

Total Visitor Counter

2649904
Share This Article