GRAMIN SEARCH BANNER

कोकणात मनसे रुजवणाऱ्या वैभव खेडेकर आणि अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी – बंटी वणजू

रत्नागिरी: कोणत्याही पक्षातील नेत्यांचे कान भरणाऱ्या टुकार मंडळीमुळे नेहेमीच चांगल्या जनसेवकांचे आणि पक्षाचेही नुकसान होते हे या वरून पुन्हा एकदा सिद्ध झाले अ‍ॅड देवेंद्र बंटी सदानंद वणजू तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार
कोणी  नेत्यांच्या कानात जाऊन काहीही सांगत आणि प्रामाणिक जनसेवकाचे  नेहेमीच नुकसान होते नुसत्या अफवेने कारवाई होते याचं उत्तम उदाहरणं म्हणजे कोकणात मनसे रुजवणाऱ्या वैभवजी खेडेकर, अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी होय.कोणत्याही पक्षातील नेत्यांचे कान भरणाऱ्या टुकार मंडळीमुळे नेहेमीच चांगल्या जनसेवकांचे आणि पक्षाचेही नुकसान होते हे या वरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

जनतेसाठी कायमच रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे वैभव खेडेकर असतील अविनाश सौंदळकर असतील किंवा संतोष नलावडे असतील  पक्षाचे प्रामाणिक काम करून पक्षात असे बक्षीस मिळत असेल तर नवीन कार्यकर्ता किंवा नेता पक्षाला कसा मिळणार…. शेवटी काम करणारा कुणीकडेही गेला तरी काम थांबावत नाहीच वैभवी खेडेकर म्हणाले तसे फिनिक्स पक्षासारखा राखेतुन यशाला गवसणी घालतोच तशीच गवसणी वैभवजी खेडेकर आणि टीम घेईलच या बद्दल तिळमात्र शंका नाही असे प्रतिपादन अ‍ॅड बंटी वणजू यांनी केले

Total Visitor Counter

2474707
Share This Article