रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा झोपडपट्टी भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव इरफान दौला मकाशी (वय ३२, रा. मुरुगवाडा-झोपडपट्टी, रत्नागिरी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी इरफान मकाशी याने घरात कुणी नसताना अज्ञात कारणातून छताच्या पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
