धामणी : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटांचे आरक्षण जाहीर झाले असून संगमेश्वर तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटांत आरक्षण सोडतीत अनेकांचे स्वप्न भंगले आहे, तर अनुकूल आरक्षण पडलेल्या अनेकांना आतापासून जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
कसबा पंचायत समिती गटाकडून भाजपचे युवा मोर्चा नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष स्वप्निल सुर्वे उमेदवार म्हणून इच्छूक आहेत
युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्निल सुर्वे सक्रिय कार्यकर्ते आहेत हा गट ओबीसी झाल्याने आपण या गटातून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे आणि वरिष्ठांना सुध्दा याची कल्पना दिली आहे
कसबा गट ओबीसी राहिल्याने सर्वाधिक चुरस पाहायला मिळू शकते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार आज जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितींच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यात अनेक बड्या नेत्यांचे जिल्हा परिषदेत पंचायत समिती मध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पक्षाने संधी दिली तर आम्ही तयारीनिशी मैदानात उतरू असा दावा स्वप्निल सुर्वे यांनी केला आहे
स्वप्निल सुर्वे यांनी आरक्षण जाहीर होताच पंचायत समिती गणात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मतदारांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. उमेदवार हा तरुण असल्याने पक्ष कोणाच्या गळ्यात उमेदवारी टाकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भाजपने यापूर्वी कसबा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता त्यामुळे यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये भाजप प्रवेश करणार कां याची उत्सुकता आहे.
स्वप्निल सुर्वे यांनी सांगितले की आपण जनतेचा सेवक म्हणून कामं करत आहे आणि यापुढेही कामं करणार असल्याचे सांगितले. मला जनतेच्या समस्यांची जाणीव आहे ती सोडवण्यासाठीच जनहिताची कामं करण्यासाठी जनतेने मला साथ द्यावी अशी विनंती स्वप्निल सुर्वे यांनी केली आहे.