संदीप लाड/श्रीवर्धन : तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
यामध्ये राज्य महामार्ग क्र १०० या आंबेत ते बागमांडला सुमारे ३०किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, नवीन पुल आणि मोऱ्या बांधण्याची योजना आहे एकूण खर्च १२६ कोटी आहे,लोणेरे ते श्रीवर्धन रस्त्याचे भूमिपूजन व दिवेआगर येथे रस्त्याचे उद्घाटन अश्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील रस्ते पायाभूत सुविधा मजबूत होणार आहेत व स्थानिक जनतेला व पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाला माजी आमदार तुकाराम सुर्वे, मतदार संघ अध्यक्ष मोहम्मद मेमन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, म्हसळा तालुका अध्यक्ष समीर बनकर माजी सभापती बाबुराव चोरगे, सुजित तांदळेकर नंदू पाटील, महेश घोले,मंगेश कोमनाक, प्रगती आदावडे शब्बीर फिर्फिरे,गणेश जावळेकर यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते विविध विभागाचे अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.