GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत चित्रीत झालेल्या ‘डुन्नु’ लघुपटाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप

Gramin Varta
12 Views

महोत्सव संबंधित कॅटेगरीमध्ये न्यूझीलंडला प्रथम क्रमांक, भारताला दुसरा क्रमांक

रत्नागिरी : राजस्थानमधील कोटा येथे नुकत्याच पार पडलेल्या चंबल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये रत्नागिरीत चित्रीत झालेल्या ‘डुन्नु’ या मराठी लघुपटाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात तब्बल १०१ देशांतील १,२०५ चित्रपटांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून ‘डुन्नु’ या फिल्मला जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे.

या महोत्सवातील संबंधित कॅटेगरीमध्ये न्यूझीलंडला प्रथम क्रमांक, तर भारताला दुसरा क्रमांक प्राप्त झाला असून भारताकडून ‘डुन्नु’ या फिल्मने हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे ही फिल्म रत्नागिरी जिल्ह्यात चित्रीत करण्यात आली असून अवघ्या ५० तासांत संपूर्ण झाली होती, हे या यशाचे विशेष आकर्षण ठरले आहे.
‘डुन्नु’ या फिल्मचे लेखन व दिग्दर्शन सुमित मालप यांनी केले आहे.
फिल्मचे निर्माते गौरांग आगाशे आणि धीरज पाटकर आहेत.
छायाचित्रण (डी.ओ.पी.) साईप्रसाद पिळणकर व सिद्धराज सावंत यांनी केले आहे.

संकलन निखिल पाडावे आणि मयुर दळी,गायन ओंकार बंडबे,संगीत पंकज घाणेकर,गीतलेखन केतकी ब्रम्हनाळकर,
संवाद लेखन मयुर दळी,तर लाईन प्रोड्युसर म्हणून रितीक सनगरे यांनी काम पाहिले आहे.
मर्यादित वेळेत आणि साधनसंपत्तीमध्ये साकार झालेल्या ‘डुन्नु’ने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळवलेला हा सन्मान मराठी चित्रपटसृष्टीसाठी तसेच कोकणातील कलाकारांसाठी अभिमानास्पद ठरत आहे. या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्जनशील कलावंतांचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Total Visitor Counter

3225531
Share This Article