GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये बंद घर फोडून 3.60 लाखोंचा दागिने, रोकड लंपास

Gramin Varta
24 Views

खेड : तालुक्यातील वेरळ-खडकवाडी परिसरात बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने मोठी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. घरातील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातून मौल्यवान सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण सुमारे 3 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनेश दिलीप पवार (36, रा. घाटकोपर) यांचे वेरळ-खडकवाडी येथील घर 24 ते 25 डिसेंबर दरम्यान बंद होते. हीच संधी साधून अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. घरातील कपाटाची झडती घेत चोरट्याने 2 लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी, 1 लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी तसेच 60 हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला.

घरमालक घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3392375
Share This Article