रत्नागिरी: रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री देवी भगवती देवीची बळ यात्रा येत्या १३ जुलै, २०२५ रोजी होणार आहे. या निमित्ताने शहरभरात धार्मिक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. भगवती मंदिर देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजता मंदिरातून बळ निघेल आणि दोन मार्गांनी शहराच्या सीमांपर्यंत जाईल.
पहिली बळ भागेश्वर मंदिर, राम मंदिर मार्गे जात पंधरा माड मिऱ्यांबंदर येथील सीमेवर पोहोचेल. तर दुसरी बळ भागेश्वर मंदिर, राममंदिर मार्गे, माडवी किनारपट्टी, घुडेवठार, तेलीआळी, एस.टी. स्टँड आणि जयस्तंभ मार्गे के.सी. जैन मारुती मंदिर येथील सीमेवर जाईल.
या पारंपरिक बळ यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भगवती मंदिर देवस्थान समितीने केले आहे.