GRAMIN SEARCH BANNER

चिपळुण : हॉस्पिटलमधून लाखांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याला ४ तासांत केली अटक

Gramin Varta
14 Views

चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील एच. आर. वुमन हॉस्पिटल येथे काऊंटर टेबलच्या ड्रॉव्हरमधून एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारे ७.५३ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देत अवघ्या चार तासांतच चोरट्याला अटक केली असून चोरीची संपूर्ण रक्कमही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

इम्रान अख्तर हुसैन अन्सारी (वय ४१, रा. मुंब्रा–ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या काऊंटर टेबलच्या ड्रॉव्हरमधून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, विकास निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, पोलीस नाईक रोशन पवार, पोलीस शिपाई शैलेश वनगे, रुपेश जोगी आदींच्या पथकाने तपास यंत्रणा गतिमान केली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा माग काढण्यात आला. चोरीनंतर तो ज्या रिक्षाने गेला होता, त्या रिक्षाचालकाच्या मदतीने पुढील माहिती मिळवण्यात आली. चोरटा चिपळूण बसस्थानकातून खेडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित बसच्या वाहकाशी संपर्क साधून चौकशी केली असता आरोपी खेड रेल्वे स्थानकात उतरल्याचे स्पष्ट झाले.खेड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आरोपी पुढे मुंबईकडे जाणाऱ्या दिवा लोकलने गेल्याचे आढळले.

तत्काळ चिपळूण पोलिसांनी दिवा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने दिवा रेल्वे स्थानकातून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत चोरी करणारा इम्रान अन्सारी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चोरीची रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा माग काढण्यात आला. चोरीनंतर तो ज्या रिक्षाने गेला होता, त्या रिक्षाचालकाच्या मदतीने पुढील माहिती मिळवण्यात आली. चोरटा चिपळूण बसस्थानकातून खेडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित बसच्या वाहकाशी संपर्क साधून चौकशी केली असता आरोपी खेड रेल्वे स्थानकात उतरल्याचे स्पष्ट झाले.
खेड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आरोपी पुढे मुंबईकडे जाणाऱ्या दिवा लोकलने गेल्याचे आढळले.

तत्काळ चिपळूण पोलिसांनी दिवा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने दिवा रेल्वे स्थानकातून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत चोरी करणारा इम्रान अन्सारी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चोरीची रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
तत्काळ चिपळूण पोलिसांनी दिवा येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने दिवा रेल्वे स्थानकातून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत चोरी करणारा इम्रान अन्सारी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चोरीची रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3262229
Share This Article