GRAMIN SEARCH BANNER

राहुल गांधींसह 25 खासदारांना धमकावणारा आरोपी ताब्यात

दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि 25 काँग्रेस खासदारांना कथित व्हिडीओच्या माध्यमातून गोळी मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला राजस्थान पोलिसांनी कोटा येथून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये स्वतःची ओळख राजसिंह अशी करून देणारा या व्यक्तीने करणी सेनेचा प्रवक्ता असल्याचा दावा केला आहे. अलीकडे लोकसभेत घडलेल्या एका घटनेबाबतही त्याने धमक्या दिल्या होत्या. त्याचा आरोप आहे की, लोकसभेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 25 काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे भाजप आणि करणी सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. कथित व्हिडिओमध्ये राज सिंहने इशारा दिला की, अशी घटना पुन्हा घडल्यास ते खासदारांच्या घरात घुसून तोडफोड करतील. तसेच त्याने थेट राहुल गांधी यांना धमकी देत म्हटले, “अशी घटना पुन्हा घडल्यास आम्ही त्या खासदारांच्या घरात घुसून तोडफोड करू. माझ्या मते ही घटना राहुल गांधी यांच्या आदेशावरून घडली आहे. राहुल गांधी, नीट ऐका – अशी घटना पुन्हा घडली तर आम्ही तुमच्या घरात घुसून तुम्हाला गोळी मारू.” तसेच, चोवीस तासांत 25 खासदारांना अटक न केल्यास त्यांना एकामागोमाग एक गोळी मारू, अशीही धमकी त्याने दिली.

सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर कोटा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. कोटा येथील पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीला बोरखेड़ा पोलिस ठाण्यात ताब्यात ठेवण्यात आले असून व्हिडिओप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.नदरम्यान भाजप आणि करणी सेना या दोन्ही संघटनांनी राज सिंह यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप कोटा शहराध्यक्ष राकेश जैन यांनीही व्हिडिओतील व्यक्तीचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

Total Visitor Counter

3420672
Share This Article