GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच; सिंधुदुर्गातील तरुणाची भंडारवाडी परिसरातून दुचाकी लंपास

Gramin Varta
184 Views

राजापूर : तालुक्यातील कोंढेतड, भंडारवाडी परिसरातून एका अज्ञात चोरट्याने १०,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस (क्र. MH-07-8437) ही दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७.३० वाजण्याच्या मुदतीत ही चोरी झाली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील रामेश्वर नगर, खारेपाटण येथील रहिवासी असलेले गणेश कृष्णा तेली (वय ४४) यांनी या चोरीप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांची दहा हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल कोंडेतद भंडारवाडी येथे उभी केलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने ती चोरून नेली. फिर्यादी यांनी १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.११ वाजता पोलीस ठाण्यात प्रवेश करून तक्रार नोंदवली.

राजापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोंकण भागातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3374365
Share This Article