GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : आयशर टेम्पो–रिक्षाची समोरासमोर धडक; दोन जखमी

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील नायरी रोडवर आयशर टेम्पो आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. मात्र रिक्षा चालक थोडक्यात बचावला. या धडकेत रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

रत्नागिरीहून नायरी बाजारात मासे घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्रमांक MH08H-2739) कळंबस्तेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कातकरी आंब्याच्या पुढील ठिकाणी पोहोचला असता, शृंगारपूरहून संगमेश्वरकडे येणाऱ्या रिक्षाला (क्रमांक MH08A-05965) जोरदार धडक बसली. रिक्षा चालक प्रमोद म्हसके यांच्या ताब्यात होती.

अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3420687
Share This Article