GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत ४२ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
7 Views

दापोली: दापोली तालुक्यातील वेळवी कलानगर येथे १८ ऑक्टोबर २०२५ रोजी एका ४२ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना उघडकीस आली आहे. उदय गजानन तांबटकर (वय ४२, रा. वेळवी कलानगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे तांबटकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय तांबटकर यांनी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून ते सायंकाळी ५.०० वाजेच्या दरम्यान वेळवी कलानगर येथील त्यांच्या राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी घराच्या माळ्यावरील लोखंडी बारला नायलॉनची दोरी बांधून, तिच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.

हा प्रकार लक्षात येताच, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उदय तांबटकर यांना मृत घोषित केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला.

दापोली उपजिल्हा रुग्णालयात रात्री ८ वाजून ५४ मिनिटांनी याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात त्याच दिवशी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी, अमृत. क्रमांक ६९/२०२५, भारतीय न्याय संहिता (B.N.S.S.) च्या कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2669144
Share This Article