GRAMIN SEARCH BANNER

आशिया कप २०२५ साठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा

Gramin Varta
6 Views

दिल्ली: हॉकी इंडियाने आगामी पुरुष आशिया कप २०२५ साठी १८ सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील नव्याने बांधलेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर खेळवली जाईल.

ही स्पर्धा बेल्जियम-नेदरलँड्स येथे होणाऱ्या FIH हॉकी विश्वचषक २०२६ साठी पात्रता फेरी आहे. भारताला जपान, चीन आणि कझाकस्तानसह पूल-ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी चीन विरुद्ध, त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध आणि १ सप्टेंबर रोजी कझाकस्तान विरुद्ध खेळणार आहे.

अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला पुन्हा एकदा संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. संघात अनुभवी हॉकीपटूंचा एक मजबूत समतोल आहे. गोलरक्षकाची जबाबदारी कृष्णा बी पाठक आणि सूरज करकेरा यांच्यावर असेल. डिफेन्स लाइनमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अमित रोहिदास यांच्यासह जर्मनप्रीत सिंग, सुमित, संजय आणि जुगराज सिंग यांचा समावेश असेल.

मिडफिल्डमध्ये मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, राजिंदर सिंग, राजकुमार पाल आणि हार्दिक सिंग असतील. अटॅक लाइनमध्ये मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग यांचा समावेश असेल. जे विरोधी डिफेन्ससाठी आव्हान उभे करतील. नीलम संजीव झेस आणि सेल्वम कार्ती यांचा बॅकअप हॉकीपटू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

टीम निवडीवर प्रतिक्रिया देताना, भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, आम्ही एक अनुभवी संघ निवडला आहे. ज्याला दबावाच्या परिस्थितीत कामगिरी उंचावण्याचा अनुभव आहे. विश्वचषक पात्रता धोक्यात असल्याने आशिया कप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच आम्हाला संयम, लवचिकता आणि विजयी भावना असलेले खेळाडू हवे होते. या संघाच्या संतुलन आणि गुणवत्तेबद्दल मी खूप आनंदी आहे. आमच्याकडे डिफेन्स, मिडफिल्ड आणि आक्रमण – प्रत्येक विभागात चांगले खेळाडू आहेत आणि ही आमची सर्वात मोठी ताकद असेल.

Total Visitor Counter

2650962
Share This Article