GRAMIN SEARCH BANNER

व्यापारी पैसा फंड संस्थेने मानले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार

प्रशालेतील ५०० विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

संगमेश्वर:- राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या तर्फे व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वर मधील ५०० विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. या मोफत छत्री वाटप कार्यक्रमाबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, संस्था सदस्य संदीप सुर्वे रमेश झगडे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप रहाटे यांनी या मोफत छत्री वाटप कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा पण इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे परिसरातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. यातील काही विद्यार्थी होतकरू व गरीब असतात. मात्र उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांना साजेशा मोठ्या छत्र्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांची उत्तम सोय केली असल्याचे मत संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश दळवी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2475388
Share This Article