GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या ‘हेळेकर मिठाई’ मालक योगेंद्र राजन हेळेकर यांचे अकाली निधन

रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध व प्रतिष्ठित ‘हेळेकर मिठाई’ या मिठाई व्यवसायाचे मालक आणि व्यवसायिक वर्तुळात आदराने ओळखले जाणारे योगेंद्र राजन हेळेकर (वय ३७) यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले.

स्वभावाने मनमिळावू, मेहनती आणि नवकल्पनांचा ध्यास असलेले योगेंद्र हेळेकर यांनी रत्नागिरीतील पारंपरिक मिठाई व्यवसायाला नवे रूप दिले होते. त्यांच्या व्यवसायिक दूरदृष्टीमुळे ‘हेळेकर मिठाई’ हे नाव आज घराघरात परिचित झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी शहराच्या व्यापार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

ते आमदार, उद्योजक, ग्राहक, आणि स्थानिक नागरिकांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. ते व्यक्तिगत जीवनातही अत्यंत प्रेमळ होते. त्यांचे आपल्या कुटुंबाशी व समाजाशी असलेले नाते अत्यंत घट्ट होते.

त्यांची अंत्ययात्रा आज (५ जुलै २०२५) सायंकाळी ५.०० वाजता माळनाक्यातील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

Total Visitor Counter

2475015
Share This Article