संगमेश्वर : कौटुंबिक कलहामुळे आलेल्या नैराश्यातून एका ५८ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कमलाकर शंकर गायकर (वय ५८, रा. शिव धामापूर, भसेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना २२ जुलै २०२५ रोजी रात्री ८ ते २३ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची माहिती २३ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजता पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर गायकर आणि त्यांच्या पत्नीमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वी संशयाच्या कारणावरून कौटुंबिक वाद झाला होता. त्यावेळी गायकर यांनी पत्नीला हाताने मारहाण केली होती. या घटनेनंतर दोघे विभक्त राहत होते. याच नैराश्यातून कमलाकर गायकर यांनी राहत्या घरातील हॉलमधील सिलिंग फॅनच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
संगमेश्वर शिव धामापूर येथे वृद्धाची आत्महत्या
