GRAMIN SEARCH BANNER

गवत मारण्याचे कीटकनाशक औषध प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू

Gramin Varta
24 Views

लांजा : दारूच्या नशेत गवत मारण्याचे विषारी कीटकनाशक औषध प्राशन केल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू होण्याची घटना लांजा तालुक्यातील सालपे येथे घडली आहे.
           
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सालपे येथील महेश विठ्ठल घाग (वय ५०) वर्षे यांनी २ ऑगस्ट रोजी दारूच्या नशेत गवत मारण्याचे विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले होते. याबाबतची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर महेश घाग यांना २ ऑगस्ट रोजी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर शैलेश विठ्ठल घाग (वय ६५) यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करीत आहेत.

Total Visitor Counter

3201985
Share This Article