GRAMIN SEARCH BANNER

उंदीर मारण्याचे विष प्राशन केलेल्या करबुडेतील वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
260 Views

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथे उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी द्रवाचे प्राशन केल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश हिरू आग्रे (६०, रा. करबुडे, ता. व जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता करबुडे येथील आंबा बागेत असताना प्रकाश आग्रे यांनी उंदीर मारण्याचे विषारी द्रव प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे करबुडे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3370002
Share This Article