GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत धक्कादायक प्रकार ; 5 वर्षाच्या बालकाला विकणाऱ्या आईसह एकाला अटक

दापोली: माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी आपल्याच ५ वर्षांच्या मुलाला विकल्याप्रकरणी एका मातेसह एका व्यक्तीविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर येथील एस.टी. स्टँडसमोर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी महिला हिने तिच्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२, रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला विकले. सत्यवान पालशेतकर याने सदर बालकाची खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

या गंभीर घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2475142
Share This Article