रत्नागिरी : निवळी-जयगड रस्त्यावरील जाकादेवी तरवळ येथे 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रक व टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गुहागरमधील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुजक्कीर अमजद जांभारकर (वय 25, रा. पडवे, गुहागर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर मुजक्कीर यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातात टेम्पोतील अमजद जांभारकर, मुजक्कीर जांभारकर आणि फिरदोस खळे ही महिला गंभीर जखमी झाली होती. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुजक्कीर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
रत्नागिरी : जाकादेवी अपघातातील जखमी गुहागरच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
