गुहागर: येथे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते गुहागर येथील भंडारी भवन सभागृहात पार पडलेल्या श्रावण भजन महोत्सवाचे उदघाटन गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भजन प्रेमींनी बहुसंख्येने गर्दी केली होती.
भजन परंपरा जपण्यासाठी तसेच स्थानिक कलाकारांना भजन सादरीकरण करण्यासाठी संधी मिळावी आणि भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडावे या एकाच उद्देशाने या श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुहागर तालुक्यातील विविध भागातील 65 भजन मंडळींनी भजन मंडळांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता विशेष म्हणजे श्रावण भजन महोत्सवानिमित्त गुहागर शहर बाजारपेठेतून भव्य दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये पारंपारिक वेशभूषा करून महिला पुरुष हाती टाळ मृदुंग घेऊन सहभागी झाले होते त्यांच्या तोंडात ज्ञानबा माऊली तुकाराम हे स्वर घुमत होते अतिशय भक्तिमय वातावरणात गुहागर मध्ये ही दिंडी उत्साहात आणि जल्लोषात पार पडली संपूर्ण गुहागर भक्तिमय झाले होते
गुहागरमध्ये श्रावण भजन महोत्सवाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते उदघाटन
