GRAMIN SEARCH BANNER

देवरुख येथे दुचाकी-रिक्षा अपघात; दुचाकीस्वार जखमी

Gramin Varta
258 Views

देवरुख : शहरातील स्वा. सावरकर चौकाजवळ दुचाकीने रिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजी बाबू नायकोडी (रा. संभाजीनगर, संगमेश्वर) हे आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ०८ एव्ही ६०६३) घेऊन देवरुखहून पाटगावाच्या दिशेने जात होते. दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या रिक्षाला (क्र. एमएच ०८ ईक्यू ७६२५) दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात नायकोडी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
स्वतःच्या दुखापतीसह अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंबाजी नायकोडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3199399
Share This Article