GRAMIN SEARCH BANNER

मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून पडून गुजरातच्या महिलेचा मृत्यू

कोलाड: मुंबईहून मंगळुरूकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून पडून सविता हिरालाल मखवाना (३०, रा. मेघानीनगर शेरी-७, रणपूर अमहदाबाद, गुजरात) हिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.

कोलाड-रोहा रेल्वे मार्गालगत असलेल्या गोवे गावाच्या हद्दीत रेल्वे पोल क्र. ७/३५ जवळ रेल्वेतून पडून महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते, पोलिस कर्मचारी आणि रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. या घटनेचा तपास मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एस. जी. भोजकर करीत आहेत.

Total Visitor Counter

2474942
Share This Article