रत्नागिरी :मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथील पाचवीतील विद्यार्थी सौबान सय्यद याने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवत उर्दू माध्यमातून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर शहरी विभागातील गुणवत्ता यादीत त्याने १५वे स्थान मिळवले असून संपूर्ण राज्यातून उर्दू माध्यमात त्याने ३९वा क्रमांक मिळवून आपल्या प्रगतीचा झळाळता ठसा उमटवला आहे.
या परीक्षेत यंदा जिल्ह्यातून एकूण ८ हजार ३४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात सौबानने मिळवलेले स्थान हे उल्लेखनीय असून त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सौबानच्या या घवघवीत यशाबद्दल मुनव्वर तांबोळी (मुख्याध्यापिका), मुश्ताक आगा (पर्यवेक्षक), अब्दुल हमीद मिस्त्री (संस्थाध्यक्ष), निसार लाला (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष), तन्वीर मिस्त्री (सचिव), शकील मजगांवकर (सहसचिव), जाहीर मिस्त्री (खजिनदार), रफीक मुकादम, इक्बाल मिस्त्री, साबीर मजगांवकर आदी मान्यवरांनी सौबान तसेच त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
या यशामागे सौबानचा अभ्यास, चिकाटी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच घटक असून त्याने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
सौबान सय्यद शिष्यवृत्तीत झळकला;उर्दू माध्यमात जिल्ह्यात पहिला आणि राज्यात ३९ वा क्रमांक
