GRAMIN SEARCH BANNER

देवरुखातील सुवर्णकार अपहरण प्रकरणातील 6 जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी

Gramin Varta
254 Views

देवरुख : शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. शुक्रवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व आरोपींना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात मुंबई येथून दोन संशयितांसह वापरण्यात आलेली वॅगनर कार जप्त करण्यात आली आहे. अद्याप दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे.

१७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास केतकर हे साखरपाहून देवरुखकडे परतत असताना वांझोळे येथे अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्या जवळील १४ लाखांचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम लुटल्यानंतर त्यांना वाटुळ येथे सोडण्यात आले. केतकर यांच्या फिर्यादीवरून देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) रत्नागिरी व देवरुख पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मंगळवारी या घटनेचा छडा लावला. दीपक राजेश लोहिरे, विशाल मनोहर आचार्य, प्रणित संजय दुधाणे आणि राजेश अनंत नवाले यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रारंभी २६ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपासात आणखी दोन आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व सहा जणांना ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे

Total Visitor Counter

3366867
Share This Article