पाचल/ राजू सागवेकर: आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन काजिर्डा येथील पाटील वाडी उत्कर्ष मंडळाने प्रवीण आर्डे यांच्या पुढाकाराने शिवसेनेत प्रवेश केला. तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला, ज्यामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.
अपूर्वा सामंत फाउंडेशनतर्फे अमित साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरावेळी हा कार्यक्रम पार पडला. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. याच कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत उत्कर्ष मंडळाच्या मुंबईतील सभासदांसह अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
प्रवीण आर्डे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष डॉ. प्रसाद पाटील, गणेश आर्डे, अमोल आर्डे, सदानंद आर्डे, सुरेश आर्डे, शंकर पाटेकर, बारक्या मांडवकर, आनंदा जोशी, लक्ष्मण गांधी आणि प्रकाश भाई आमकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे काजिर्डा गावात शिवसेनेला अधिक बळकटी मिळाली असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.