रत्नागिरीत २५ फेब्रुवारीला पाककला महास्पर्धा

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील गृहिणी आणि पाककलाप्रेमींसाठी येत्या २५ फेब्रुवारीला पाककला महास्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.रत्नागिरीत नव्याने सुरू होत असलेल्या कोकम करी थीम रेस्टॉरंटतर्फे ही रत्नागिरी जिल्हा मर्यादित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पारंपरिक व लुप्त पावत चाललेल्या कोकणी पदार्थांना व्यासपीठ देण्यासाठी स्पर्धा होणार आहे. शाकाहारी, मत्स्याहारी आणि मांसाहारी अशा तीन प्रकारात स्पर्धा होणार असून विजेतीला २१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत एकूण ५१ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे स्पर्धा २५ फेब्रुवारी रोजी जे.के. फाइल्सजवळ होणार आहे. छंदाला मिळणार करिअरची दिशा मिळावी, हाही स्पर्धेचा उद्देश आहे.

स्पर्धेसाठी सोबत दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी, असे सूचित करण्यात आले आहे. ही लिंक अशी –

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScsOx01bC-4LxnnjxL5IAGwmwonINJjp7O0E_KQuKo_6uDkpA/viewform?usp=dialog

अधिक माहितीसाठी 8010803302, 9370550302 किंवा 9822290859 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *