GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : पर्यटन क्षेत्रात महिलांना नवी दिशा देणारी कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी: कोकणातील महिलांसाठी पर्यटन क्षेत्रातील करिअरच्या संधींचा वेध घेणारी मोफत शैक्षणिक कार्यशाळा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे
(दि.२१ जुलै) रत्नागिरीत मोठ्या उत्साहात पार पडली.

पर्यटन क्षेत्रात महिलांना सुवर्णसंधी – पर्यटनातील करिअर : दिशा आणि संधी या विषयावर आधारित या कार्यशाळेत कोकणातील पर्यटन क्षेत्राचे बहुआयामी पैलू उलगडून दाखविण्यात आले. कोकणातील पर्यटनाची ओळख या विषयावर प्राचीन कोकणचे संचालक वैभव सरदेसाई यांनी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकत विविध गोष्टीरूप उदाहरणे देत कोकणातील पर्यटनाची पार्श्वभूमी उलगडली.

पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय व रोजगार संधी या विषयावर लॅटरल कन्सेप्टचे पार्टनर मकरंद केसरकर यांनी मार्गदर्शन करताना महिला उद्योजकतेच्या संधी, स्टार्टअप कल्पना व फील्ड अनुभव सांगितले. पर्यटन शिक्षणातील संधी या विषयावर परशुराम शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या प्रा. डॉ. मीनल ओक यांनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना या क्षेत्रात स्थिर व यशस्वी करिअर घडविण्याचे मार्ग मांडले. दोन्ही व्याख्यात्यांनी पर्यटन व्यवसायातील रोजगार संधींवर त्यांनी प्रकाश टाकला.यानंतर बाया कर्वे संस्थेच्या टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी कोर्सबद्दल व इतर कोर्सबद्दल सविस्तर पीपीटी प्रेझेंटेशन टुरिझम कोर्स समन्वयक प्रा. सोनिया मापुस्कर यांनी केले.प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी प्रास्ताविक करून संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यावेळी प्रकल्प प्रमुख मंदार सावंत देसाई, स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या सौ. स्वरूपा सरदेसाई, कर्मचारी आणि हॉटेल इंडस्ट्रीमधील मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

2455607
Share This Article