GRAMIN SEARCH BANNER

एचएसआरपी’ नंबर प्लेट बसविण्यात रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल

रत्नागिरी : उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे असून, जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या २,११,४२३ वाहनांपैकी ९९,४९५ वाहनांवर “एचएसआरपी’ बसवण्यात आल्या आहेत, हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असून, ते राज्यात अव्वल असल्याची माहिती रत्नागिरीतील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट वाहनांची
सुरक्षा वाढते आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामुळे राज्याच्या परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना या नंबरप्लेट सक्तीचे केले आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या २,११,४२३ एकूण वाहनांची संख्या इतकी आहे. यापैकी

‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी १,२५,९७९ वाहनांनी २७ केंद्रांवर बुकिंग केले आहे. त्यापैकी ९९,४९५ वाहनांना एचएसआरपी बसविल्या आहेत. यासाठी आता पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

त्यानंतर १ डिसेंबर २०२५ पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनमालकांच्या वाहनांची पुनःनोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात येतील. वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एचएसआरपी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी करपे यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील वाहनधारकांनी सकारात्मकता दर्शविल्याने आतापर्यंत एक लाख वाहनांना एचएसआरपी बसविण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत उर्वरित वाहनधारकही एचएसआरपी बसवून घेतील. त्यामुळे मुदतीपूर्वी जिल्ह्यात १०० टक्के काम पूर्ण होईल.
– राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी.

नंबरप्लेट केंद्रांची संख्या २७

सुरुवातीला जिल्ह्यासाठी चिपळूण, खेड आणि रत्नागिरी, अशा तीन शहरांमध्येच नंबर प्लेट बसविण्यासाठी केंद्रे निश्चित करण्यात आली होती. आता २७ नंबर प्लेट केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

Total Visitor Counter

2474944
Share This Article