GRAMIN SEARCH BANNER

‘तुतारी’चे इंजिन बिघडले, कणकवली स्थानकात प्रवासी 3 तास ताटकळले

कणकवली : मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारी तुतारी एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी 11.37 वा. कणकवली रेल्वे स्थानकात पोहोचली असता तिच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निर्दशनास आले.

हा बिघाड दुरुस्त होत नसल्याने वेर्णे-गोवा येथून नवीन इंजिन आणून ही एक्स्प्रेस दुपारी 2.43 वा. गोव्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. इंजिन बिघाडमुळे तब्बल 3 तास एक्स्प्रेस कणकवली रेल्वे स्थानकात अडकून पडल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.

तुतारी एक्स्प्रेस कणकवली स्थानकात पोहोचल्यानंतर इंजिनातील तांत्रिक बिघाडाची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनादिली. तसेच पर्यायी इंजिन येईपर्यंत तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकातच उभी राहील असेही, प्रशासनाकडून सांगण्यात आले.पर्यायी इंजिन हे वेर्णे – गोवा येथून कणकवलीत आणण्यात आले व कणकवलीत रेल्वे स्थानकात ते जोडल्यानंतर ते गोव्याकडे मार्गस्थ झाले असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. अर्थात, एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली. मात्र, यासाठी 3 तासाचा विलंब झाला.

प्रवाश्यांचे हाल …….

एक्सप्रेसमधील बिघाड निदर्शनास आल्यानंतर अनेक प्रवाशांनी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करत गोव्याच्या दिशेने जाणे पसंत केले. तांत्रिक बिघाड व त्यामुळे झालेला विलंब या सर्व प्रकारामुळे प्रवाश्यांचे हाल झाले. मात्र, बिघाड वेळीच निदर्शनास आल्याने पुढील दुर्घटना टळली.

Total Visitor Counter

2475142
Share This Article