GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमधील भोम सहकारी सोसायटीमध्ये 17.75 लाखांचा अपहार करणाऱ्याला पुण्यातून अटक

दोन दिवसांची पोलीस कोठडी

चिपळूण : तालुक्यातील भोम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये तब्बल 17 लाख 75 हजार 375 रुपयांचा अपहार झाल्याची घटना 1 एप्रिल 2024 रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी संस्थेचा सचिव योगेश प्रमोद भोबेकर (मालदोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीच्या घटनेनंतर गायब झालेल्या भोबेकर याला चिपळूण पोलिसांनी पुणे येथून अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी लेखापरीक्षक वैभव रामचंद्र ठसाळे (चिपळूण) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार योगेश भोबेकर याने 2023-2024 आर्थिक वर्षात सोसायटीच्या व्यवहारांची चुकीची माहिती संचालक आणि पदाधिकाऱ्यांना न देता 17.75 लाखांचा अपहार केला होता.

गुन्हा दाखल होताच भोबेकर फरार झाला होता. दरम्यान, तो पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक पुण्यात गेले. तेथे बदली चालक म्हणून काम करत असताना पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात तो अडकला आणि शनिवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Total Visitor Counter

2475141
Share This Article