GRAMIN SEARCH BANNER

ओबीसी हक्कांवर गदा आणणारा शासन निर्णय रद्द करा

Gramin Varta
59 Views

देवरुख – तेली समाज सेवा संघतर्फे तहसीलदारांना निवेदन

देवरुख : तेली समाज सेवा संघ, संगमेश्वर तालुका यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर रोजी देवरुख येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे तेली तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

देवरुखचे प्रभारी तहसीलदार श्री. सुदेश गोताड यांना हे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी तेली समाज सेवा संघ संगमेश्वर तालुक्याचे अध्यक्ष श्री. संतोष रहाटे, सचिव श्री. योगेश चव्हाण, महिला अध्यक्ष श्रीमती दीपिका किर्वे, उपाध्यक्ष श्री. पांडुरंग रहाटे, प्रांतिक महिला अध्यक्ष सौ. प्रीया भोपळकर, मधुरा भोपळकर, श्री. संतोष किर्वे, श्री. जनार्दन रहाटे, श्री. राजेश झगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार श्री. रामदास तडस यांच्या मार्गदर्शनानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारे निवेदन सादर करण्यात आले. तेली अर्थात ओबीसी आरक्षणाला धक्का बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर, दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटियरआधारित मराठा-कुणबी आरक्षणासंबंधीचा काळा शासन निर्णय रद्द करावा तसेच न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा-ओबीसी उपसमिती बरखास्त करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

Total Visitor Counter

3366863
Share This Article