ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्ग खड्ड्यांनी भरला, वाहनचालक त्रस्त; PWDचं ठरवलेलं दुर्लक्ष; ग्रामस्थांचा संताप!
तुषार पाचलकर /राजापूर : तालुक्यातील ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात अक्षरशः खड्ड्यांचा सुळसुळाट होतो. या मार्गाने प्रवास करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. जवळपास अर्धा फूट खोल खड्डे, रस्त्यावर साचलेली माती आणि मोठमोठे दगड परिणामी वाहनधारक त्रस्त आणि संतप्त झाले आहेत.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहनं प्रवास करतात. विशेषतः पाचलसारखी मोठी बाजारपेठ असूनही रस्त्याची अवस्था भयावह आहे. दरवर्षी ग्रामस्थ ओरडतात, आंदोलन करतात, तेव्हा कुठे सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होतो आणि केवळ डागडूजी केली जाते. पण यंदा ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली आहे.
सरपंच अमर जाधव यांचा थेट इशारा
जर यंदा वेळेत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर आम्ही आंदोलन रस्त्यावरच करू आणि राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकू!”
विटापेठ-मलकापूर-अनुस्कुरा-साटवली-पावस या मार्गावरून मुंबई-पुण्याकडून गोवा आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तरीही या मार्गाकडे PWD मुद्दाम दुर्लक्ष करत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांनी सतत तक्रारी करूनही केवळ “उद्या होईल” अशी कामचलावू उत्तरं मिळत आहेत. त्यामुळे या वेळी स्थानिकांचा संयम सुटला असून रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.
रस्ता दुरुस्त करा..अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकू: पांगरी सरपंच अमर जाधव यांचा थेट इशारा

Leave a Comment