GRAMIN SEARCH BANNER

मुंबई गोवा महामार्गावर कामथे घाटात सिमेंट ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी

Gramin Varta
231 Views

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात आज सकाळी सुमारे ११.४५ वाजता सिमेंटने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावर सिमेंटच्या बॅगांची उधळण झाली. चालकाचे नाव साखम मुद्रीत खान (वय ३०, रा. राजस्थान) असे असून तो बदलापूरकडे सिमेंट घेऊन जात होता. कामथे घाटातील वळणावर भरधाव वेगामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

Total Visitor Counter

3376609
Share This Article