GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमीन नोंद प्रकरणी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा

मुंबई: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवराहाटी म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर पारंपरिक जुन्या मंदिर व परिसरात विकास कामे करण्यासाठी या संदर्भातील वन विभाग, महसूल विभागाकडे असलेल्या जमिनींच्या नोंदी, न्यायालयास सादर केलेले अहवाल या बाबतचा सविस्तर आढावा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला.

राज्यमंत्री श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या महसूल व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवराहाटी जमीन म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर पारंपरिक जुनी मंदिरे असल्याने या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, नव्याने बांधकाम करणे, सभागृह, सभामंडप, बगीचा करणे, नळपाणी योजना, अंगणवाडी शाळा, व्यायामशाळा, स्वच्छता गृह अशी विकासाची कामे करण्यास अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे या जमिनींच्या नोंदी संदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात यावा. वन व महसूल विभागाने त्यांच्याकडील या संदर्भातील नोंदी तपासून विकास कामे करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Total Visitor Counter

2455558
Share This Article