संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील लोवले फटकरेवाडी, मयूरबाग येथील रहिवासी राजाराम सदाशिव गुंडे उर्फ बारकू यांचे ( ७१ )आज वृद्धापकाळमुळे राहत्या घरी दुःखद निधन झाले .
राजाराम गुंड शेती आणि मोलमजुरी करत. आपल्या दोन मुलाना त्यांनी खूप कष्ट करून शिकवले. लोवले गावातील नमन खेळ्यामध्ये ते वानकरण्या खूप छान म्हणत असत. त्यांना आयुर्वेदिक औषधांबद्दल माहिती होती. गावासह आजूबाजूच्या परिसरातील आजारी रुग्णांना ते मोफत आयुर्वेदिक औषधे देत असत.
राजाराम यांना चार भाऊ आणि एक बहिण, त्यांना आपल्या भावाचा चांगला आधार होता. सर्व भाऊ नोकरी निर्मित मुंबई येथे वास्तव्याला असतात. गावाकडे असणारी शेती राजाराम यांनी संभाळली. शेतीसाठी त्यांच्याकडे बैल होते आणि गाईगुरे सांभाळण्याची त्यांना आवड होती.लोवले फटकरेवाडीत ते एक आधारस्तंभ समजले जात. स्वतःसाठी ते आयुष्यात कधीच डॉक्टरकडे गेले नाहीत. अखेर आज वृद्धातकाळामुळे राहत्या घरी त्यांचे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगी सुना नातवंड असा परिवार आहे. त्यांच्यावर आज मयूर बाग येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगमेश्वर: आयर्वेदिक औषधं देणारे राजाराम गुंडे कालवश
