GRAMIN SEARCH BANNER

अखेर 22 तासांनी सापडला अल्सुरे येथे बुडालेल्या तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
49 Views

खेड (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील अलसुरे-भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी गुरुवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. जगबुडी नदीत बुडून मंगेश पाटील (वय ४०) या तरुणाचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला दुसरा तरुण कसेबसे पोहत बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भोस्ते येथील पाटीलवाडीचे रहिवासी असलेले मंगेश पाटील यांच्या घरी यावर्षी पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन झाले होते. गुरुवारी, गणेशमूर्ती विसर्जनासाठी मंगेश आणि त्यांच्यासोबत आणखी एक तरुण जगबुडी नदीपात्रात उतरले. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने दोघेही बुडू लागले. दुसऱ्या तरुणाने कशीबशी पोहत नदीचा किनारा गाठला, पण मंगेश पाटील मात्र प्रवाहाच्या जोरदार प्रवाहामुळे बुडाले.

ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तात्काळ खेड नगर परिषदेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक आणि खेड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. सोबतच, एनडीआरएफचे पथकही तातडीने मदतीसाठी पोहोचले. या सर्व यंत्रणांनी रात्रभर मंगेश पाटील यांचा शोध घेतला, पण त्यांना यश आले नाही.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेतला. मंगेश पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

2647746
Share This Article