GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांना प्रवेश बंदी

रायगड: गौरी गणपतीचा उत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई – गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.

बंदीचे वेळापत्रक:-

२३ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपासून ते २९ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत राहिल.तसेच

२ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपासून ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत तसेच ६ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई- गोवा महामार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी राहिल…अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

Total Visitor Counter

2474941
Share This Article