GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : गणपतीपुळेच्या संगम चव्हाणला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

Gramin Varta
228 Views

समीर शिगवण / रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावी अशी कामगिरी गणपतीपुळेच्या छोट्या विराने केली आहे. बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंडचा खेळाडू संगम सुयोग चव्हाण याने आपली चमकदार कामगिरी सादर करत 69 व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लवकरच त्याचा सन्मान करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा दिनांक 27 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान नागालँड पोलीस कॉम्प्लेक्स, चुंबकेदमा येथे पार पडली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग, कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी अवघा 12 वर्षीय सुयोग याची निवड झाली होती. त्याची ही निवड योग्य असल्याचे सिद्ध  करत राज्य स्तरावर त्याने सुवर्णपदकाची चमकदार कामगिरी केली आहे. त्याचे वडील हॉटेल मध्ये काम करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. तर आई ही गृहिणी आहे. मात्र अशाही परिस्थितीत वडिलांनी त्याला पाठिंबा देत शिक्षणासाठी प्रवृत्त केले आहे. त्यांच्या मेहनतीला मुलानेही फळ देत नाव सार्थकी लावले आहे.

संगम सुयोग चव्हाण याने तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर सुवर्णपदके पटकावली आहेत. याबद्दल त्याचा गणपतीपुळे येथे 16 ऑक्टोबर रोजी भव्य सत्कारही करण्यात आला होता. त्यानंतर तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाला. अखेर राष्ट्रीय स्तरावरही त्याने सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राचा झेंडा उंचावला.

या यशानंतर शाळेचे चेअरमन बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, किशोर पाटील, मेहंदळे गुरुजी, रोहित मयेकर, परेश हळदणकर, मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर आणि सर्व शिक्षकवर्ग यांनी संगमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या विजयानंतर क्रीडा शिक्षक व तायक्वांदो प्रशिक्षक रुपेश तावडे (ब्लॅक बेल्ट, राष्ट्रीय पंच, युनिव्हर्सिटी सुवर्णपदक विजेता) आणि क्रीडा शिक्षक संजय थोरात यांनी त्याला मार्गदर्शन केले.

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा तायक्वांदो अध्यक्ष वेंकटेश्वरा राव कररा, सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, संजय सुर्वे, मयूर घेतले, राकेश जाधव, तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील तायक्वांदो अकादमीचे प्रशिक्षक व पदाधिकारी यांनी संगमच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या.

गणपतीपुळे-मालगुंड विभागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, खेळाडू, आणि राज्य तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, तसेच राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी संगम सुयोग चव्हाण याचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3200120
Share This Article